कविता

Nishabd chya hya vibhaga antargat tumhala mazya sarv mhanjech Marathi, Hindi ani English kavita vachayala miltil.

te-tu-tharav

ते तु ठरव

पाणावलेले डोळे करतील स्वागत तुझे पण तुला हसताना पाहण्यासाठी मी थोडा हसेलही मला पाहून हसायचं कि नाही ते तु ठरव नेहमीसारख्याच रंगाव्या गप्पा असा माझा प्रयत्न असेल पण जुन्या-नव्या तक्रारीँवरुन तुझ्यावर रागवेलही माझ्या अशा वागण्यावर रुसायचं कि नाही ते तु…

kadhi-kadhi

कधी कधी

कधी कधी कडू आठवणींचा ओघळ डोळ्यांतून नकळत वाहतो भिजलेल्या पापण्यांवर शेवटचा अश्रु मोत्यासारखा चमकत राहतो बोलतात फ़क्त डोळे अन् मी मुक होऊन दुखाच्या सागरात न्हाहतो क्षण तो सरताच सावरतो स्वताला अन् त्याच डोळ्यांनी सुंदर स्वप्न पाहतो

ek-divas-asahi-asel

एक दिवस असाही असेल

एक दिवस असाही असेल आनंदाचा तुझ्यावर वर्षाव होईल पण ओठांवर मात्र हास्य नसेल एक दिवस असाही असेल दु:खाने पाणावतील तुझे डोळे पण डोळ्यातलं पाणी पुसणारा तो हात नसेल एक दिवस असाही असेल शोधत फिरेल तुझी नजर एकच चेहरा पण तो…

boltana-jya-shabdani

बोलतांना ज्या शब्दांनी

बोलतांना ज्या शब्दांनी करायचीस तु माझ्या हृदयावर प्रेमाचे घाव तो प्रत्येक शब्द माझ्या मनाच्या भिंतीवर कोरलाय मी ऐकून ज्या हृदयाचे शब्द खेलायचीस तु माझ्या मनाशी प्रेमाचा लपंडाव त्या हृदयाचा एक तुकडा तुझ्या नकळत चोरलाय मी

rahunach-gel

राहूनच गेलं

खूप बोलायचो आम्ही, गप्पाही खूप रंगायच्या पण तिला बोलताना पहायचं राहूनच गेलं खूप करायचो मस्करी, हसणंही खूप व्हायचं पण तिला हसताना पहायचं राहूनच गेलं कधी कधी गालातली गालात लाजायचोही पण तिला लाजताना पहायचं राहूनच गेलं असायचो जवळ एकमेकांच्या, तिची सोबतही…

ek-nat-shabdat-gurfatlel

एक नातं शब्दांत गुरफटलेलं

एक नातं शब्दांत गुरफटलेलं शब्दांतच ओळख, शब्दांतच मैत्री शब्दांतच विश्वास, शब्दांतच खात्री शब्दांतच सोबत, शब्दांतच सहवास शब्दांतच आनंद, शब्दांतच त्रास शब्दांतच रडणं, शब्दांतच हसणं शब्दांतच रागावणं, शब्दांतच रूसनं शब्दांतच जवळीक, शब्दांतच अंतर शब्दांतच मर्यादित, शब्दांतच निरंतर एक नातं शब्दांत गुरफटलेलं…