नातं जुळल्यावर सगळेच काळजी करतात; नातं नसताना काळजी करतात ती खरी प्रेमाची माणसं.

प्रतिक अक्कावार

आयुष्यात बऱ्याचदा काही व्यक्ती अश्या दुरावतात कि त्या पुन्हा भेटतात  ते आपले श्वास संपल्यावरच. अश्या व्यक्तींची वाट पाहण्यापेक्षा आपले श्वास संपण्याची वाट पहावी कारण अश्या व्यक्ती कधी परततील हे ठामपणे  सांगता येत नाही, मात्र आपले श्वास कधीतरी संपणार याची पक्की खात्री असते.

प्रतिक अक्कावार

माणसाच्या तोंडून सत्ता किंवा संपत्ती बोलू लागली कि तो माणूस राहत नाही; त्याचे रुपांतर उन्मत्त राक्षसात झालेले असते.

प्रतिक अक्कावार

जेव्हा एखादी मुलगी एकाच वेळी तुमची प्रेयसी, मैत्रीण, प्रेरणा आणि कल्पना बनु लागते तेव्हा समजुन जावे तिच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही मुलगी तुमची पत्नी बनण्यास जास्त योग्य असु शकत नाही.

प्रतिक अक्कावार

आजच्या तंत्राद्यानाच्या युगात सर्वांना शब्दांमध्ये दडलेल्या भावना ओळखता आल्या पाहिजे नाहीतर शब्दांमध्ये झालेले संवाद अर्थशुन्य अक्षरं बनून राहतील यात शंका नाही.

प्रतिक अक्कावार