कॉर्नरवरच्या त्या मुलीशी मन सध्या मैत्री करु पाहतय
तिच्या मनाशी बोलायला वेडं शब्दांवर विसंबुन राहतय
पुर्वी कधीतरी कैंटिनला माझ्या नजरेस ती पडली होती
तिला परत पाहण्याची इच्छा मनात नव्यानेच जडली होती
कैंटिनच्या गर्दित तिला शोधण्याचा खेळ कधी संपला आठवत नाही
पण विसर फक्त काळाचा पडला, तिचा विसर पडल्याचं आठवत नाही
नंतर ती अधुन मधून दिसायला लागली
कधी कैंटिनहून खाली येताना तर कधी जिन्याने वर जाताना
कधी मी फर्स्ट शिफ्टला येताना तर नाईट शिफ्ट करुन घरी जाताना
कधी सिंपल सुंदर पंजाबी ड्रेस मध्ये तर कधी बोल्ड ब्लु जिन्स-शर्ट मध्ये
पूर्वी ती कधी कधीच दिसायची आता रोजच दिसते
जवळच काँर्नरच्या एका काळ्या खुर्चीवर बसते
भिंतीमुळे तिला पाहण्याची संधी तशी कमीच मिळते
कॉर्नरवरून जाताना मात्र नजर तिच्यावरच खिळते
सकाळी अर्धवट ओल्या केसांभोवती गुंडाळलेला तिचा स्कार्फ खुर्चीच्या डाव्या हातावर असतो
कपाळावर लावलेल्या टीचभर अंगाऱ्यामुळे तिचा सोज्वळ चेहरा आणखीणच तेजस्वी दिसतो
ऑफिसमध्ये शिरल्यावर ती आणि तिचा कॉम्पुटर एवढच तिचं जग असतं
काम सोडून इतर कलीग्जशी गप्पा मारत बसण्याचं काम तिच्याकडे नसतं
सकाळी अगदी वेळेत येणं हा जणू तिचा रूल आहे
मला पटत नसलं तरी तिचं हे वागणं कूल आहे
मुलांना स्वत:पासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न तिच्या वागण्यात नेहमीच असतो
त्यामुळे सगळ्यांच मुलांना तिच्या वागण्यात थोडासा अँटिट्युड दिसतो
ती कधीच अनोळखी मुलाशी बोलणार नाही याची मलाही खात्री आहे
पण न बोलताच जिथे मनाच्या तारा जुळतात तिच तर खरी मैत्री आहे
काय वाटतं, आवडेल का तिला माझी मैत्रीण बनायला?
Hi Pratik,
Mast kavita कॉर्नर 🙂
लय भारी
awesome poem pratik…she will like your friendship…