वेगळेपण
सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात. स्वभाव, आचार-विचार, आवड-निवड, राहणी अशा अनेक बाबतीत एक व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असते. व्यक्ती-व्यक्तींमधील ही भिन्नता कमी जास्त प्रमाणात असते आणि ह्या भिन्नतेमध्येही साम्य शोधणे हा माणसाचा गुणधर्मच म्हणावा लागेल. माणसाला आपल्या स्वतः सारख्याच व्यक्ती सभोवताली…