पाणावलेले डोळे करतील स्वागत तुझे
पण तुला हसताना पाहण्यासाठी मी थोडा हसेलही
मला पाहून हसायचं कि नाही ते तु ठरव

नेहमीसारख्याच रंगाव्या गप्पा असा माझा प्रयत्न असेल
पण जुन्या-नव्या तक्रारीँवरुन तुझ्यावर रागवेलही
माझ्या अशा वागण्यावर रुसायचं कि नाही ते तु ठरव

ह्यावेळी आपल्या आठवणीँच्या त्या सुंदर जगात तुला नेणं शक्य होणार नाही
पण तुझ्या मनात माझं नाव कुठेतरी लिहिलेलं असेलही
माझ्या आठवणीँप्रमाने माझं नाव पुसायचं कि नाही ते तु ठरव

निरोप घेताना हात पकडून तुला थांबवणे जमणार नाही
पण तु आणखी थोड्यावेळ थांबावे असा आग्रह करेलही
परत माझ्या शेजारी येऊन बसायचं कि नाही ते तु ठरव

तु मला सोडून जाताना तुझ्याकडे बघवणार नाही
पण शेवटचं तुला डोळे भरून पाहण्यासाठी नजर चोरून बघेलही
माझ्या नजरेसमोर येऊन मला दिसायचं कि नाही ते तु ठरव

pratikakkawar
प्रतिक अक्कावार

शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.