एक दिवस असाही असेल
आनंदाचा तुझ्यावर वर्षाव होईल पण
ओठांवर मात्र हास्य नसेल
एक दिवस असाही असेल
दु:खाने पाणावतील तुझे डोळे
पण डोळ्यातलं पाणी पुसणारा तो हात नसेल
एक दिवस असाही असेल
शोधत फिरेल तुझी नजर एकच चेहरा
पण तो चेहरा फक्त आठवणीतच दिसेल
एक दिवस असाही असेल
तरसतील तुझे कान एक आवाज ऐकण्यासाठी
पण बोलणारं मात्र ते मन नसेल
एक दिवस असाही असेल
विचारशील तु बरेच प्रश्न
पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मौन असेल
एक दिवस असाही असेल
वाटेल तुला भेट व्हावी
पण तेव्हा नशीबाची साथ नसेल
एक दिवस असाही असेल
वाटेल तुला परतावे मागे
पण वाट पाहणारं ते काळीज नसेल