कोणीच नसावे आपले स्वतःचे
कोणीच नसावे आपले स्वतःचे आपलेपणाचा भासच नको कोणतीच नाती नसावी खरी खोटा तो विश्वासच नको कोणतीच नसावी वाट सुखाची आशेवरचा प्रवासच नको कोणतेच नसावे कारण जगण्याला निरंतर चालणारे ते श्वास च नको
शब्दांचा निरंतर प्रवास
शब्दांचा निरंतर प्रवास
कोणीच नसावे आपले स्वतःचे आपलेपणाचा भासच नको कोणतीच नाती नसावी खरी खोटा तो विश्वासच नको कोणतीच नसावी वाट सुखाची आशेवरचा प्रवासच नको कोणतेच नसावे कारण जगण्याला निरंतर चालणारे ते श्वास च नको
शब्द पुरेसे नसले तरी प्रेम अबोल राहत नाही ते व्यक्त होतं कधी कोणाच्या विचारांतून तर कधी कोणाच्या वागण्यातून कधी कोणाच्या हसण्यातून तर कधी कोणाच्या रडण्यातून कधी कोणाच्या नजरेतून तर कधी कोणाच्या स्पर्शातून कधी कोणाच्या काळजीतून तर कधी कोणाच्या रागातून प्रेम…
जूळले विचार जूळली मने पण विश्वासाची नाती कधी जूळलीच नाही चिंब भिजली ती माझ्या मैत्रीत पण माझ्या मैत्रीची खोली तिला कळलीच नाही
ओझरत्या नजरेने शेवटचे तुला पाहीन मी तुझ्या सांगण्यावरून तुझ्यापासून दूर जाईन मी तुझे हृदय देशील ही तु दुसऱ्या व्यक्तीला पण तुझ्या हृदयात अविस्मरणीय आठवण बनून राहीन मी
कोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या विखुरलेल्या पाकळ्या झाल्या प्रेमाने घट्ट बांधल्या गेलेल्या गाठी अलगद मोकळ्या झाल्या रेशमापेक्षा नाजुक ऋणानुबंधांच्या छिन्न विछिन्न साखळ्या झाल्या
रंगहिन वाटे चित्र सारे हरवल्यात सगळ्या रंगछटा धुसर दिसती सर्व दिशा काळोखात निजल्या सगळ्या वाटा मी आता केवळ एका निश्चल सागरा सारखा शमल्या आहेत सगळ्या लाटा