शब्द पुरेसे नसले तरी
प्रेम अबोल राहत नाही
ते व्यक्त होतं
कधी कोणाच्या विचारांतून तर
कधी कोणाच्या वागण्यातून
कधी कोणाच्या हसण्यातून तर
कधी कोणाच्या रडण्यातून
कधी कोणाच्या नजरेतून तर
कधी कोणाच्या स्पर्शातून
कधी कोणाच्या काळजीतून तर
कधी कोणाच्या रागातून
प्रेम हे नेहमी बोलत असतं
व्यक्तीच्या निरागस भावनांतून