कोणीच नसावे आपले स्वतःचे
आपलेपणाचा भासच नको
कोणतीच नाती नसावी खरी
खोटा तो विश्वासच नको
कोणतीच नसावी वाट सुखाची
आशेवरचा प्रवासच नको
कोणतेच नसावे कारण जगण्याला
निरंतर चालणारे ते श्वास च नको
कोणीच नसावे आपले स्वतःचे
आपलेपणाचा भासच नको
कोणतीच नाती नसावी खरी
खोटा तो विश्वासच नको
कोणतीच नसावी वाट सुखाची
आशेवरचा प्रवासच नको
कोणतेच नसावे कारण जगण्याला
निरंतर चालणारे ते श्वास च नको