एक नातं शब्दांत गुरफटलेलं
शब्दांतच ओळख, शब्दांतच मैत्री
शब्दांतच विश्वास, शब्दांतच खात्री
शब्दांतच सोबत, शब्दांतच सहवास
शब्दांतच आनंद, शब्दांतच त्रास
शब्दांतच रडणं, शब्दांतच हसणं
शब्दांतच रागावणं, शब्दांतच रूसनं
शब्दांतच जवळीक, शब्दांतच अंतर
शब्दांतच मर्यादित, शब्दांतच निरंतर
एक नातं शब्दांत गुरफटलेलं
थोडं नाजूक, थोडं खास
वेड्या मनाने चालू ठेवलेला शब्दांचा सुंदर प्रवास