रिमझिम पावसाच्या पाण्यात
रिमझिम पावसाच्या पाण्यात जरी नाही भिजलो तरी मन मात्र तुझ्याच आठवणीने भिजलेलं राहील पसरतील ढग, बदलतील ऋतु अन् पावसाचं पाणीही सरुन जाईल पण नेहमीच येत राहील तुझी आठवण अन् आपल्या मैत्रीचा ओलावा कायम मनात राहील
शब्दांचा निरंतर प्रवास
शब्दांचा निरंतर प्रवास
रिमझिम पावसाच्या पाण्यात जरी नाही भिजलो तरी मन मात्र तुझ्याच आठवणीने भिजलेलं राहील पसरतील ढग, बदलतील ऋतु अन् पावसाचं पाणीही सरुन जाईल पण नेहमीच येत राहील तुझी आठवण अन् आपल्या मैत्रीचा ओलावा कायम मनात राहील
कधी कधी अनोळखी नजरही ओळख देऊन जाते कुणाची रंगहीन सावलीही जीवनात रंग भरून जाते नातं जुळायला सहवासाची गरज नसते कधी कधी एक भेटही आयुष्यभराचा सहवास देऊन जाते
काय म्हणालास? आठवण? हो, येते ना तुझी आठवण कधी सायंकाळचा गारवा तर कधी सकाळचं कोवळ ऊन घेऊन कधी ओठातले शब्द तर कधी निशब्द झालेले मौन घेऊन कधी रेटाळलेला दिवस तर कधी नकळत सरलेला क्षण घेऊन कधी डोक्यातला विचार तर कधी…
आठवणी जुन्या स्मरल्या अशा ओठ जूनेच गीत गाऊन गेले आठवणी जुन्या स्मरल्या अशा मन जूनीच स्वप्ने नयनांत ठेऊन गेले आठवणी जुन्या स्मरल्या अशा डोळ्यांतून नकळत पाणी वाहून गेले आठवणी जुन्या स्मरल्या अशा मन आसवांत मनसोक्त न्हाऊन गेले आठवणी जुन्या स्मरल्या…
दोन चार भेटीगाठी अन् कायमचा दूरावा थोडी फार सोबत अन् काही आठवणींचा पुरावा ते आहे एखाद्या सावलीसारखं ज्यासाठी ऊन्हातून चालावसं वाटावं ते आहे एखाद्या स्वप्नासारखं जे वारंवार पडावं ते आहे सप्तरंगांनी सजलेलं सुंदरसं चित्र ते आहे एक अतुट नातं तुझं…
आठवणी असाव्यात ह्रदयाला स्पर्शून जाणाऱ्या प्रत्येक स्पंदनासोबत ह्रदयात मुरणाऱ्या जिवंतपणाचा भास देणाऱ्या जगण्याची आस देणाऱ्या डोळ्यांत पाणी असताना हसवणाऱ्या मनात खोल जाऊन काळजाला भिडणाऱ्या