दोन चार भेटीगाठी
अन् कायमचा दूरावा
थोडी फार सोबत
अन् काही आठवणींचा पुरावा
ते आहे एखाद्या सावलीसारखं
ज्यासाठी ऊन्हातून चालावसं वाटावं
ते आहे एखाद्या स्वप्नासारखं
जे वारंवार पडावं
ते आहे सप्तरंगांनी सजलेलं सुंदरसं चित्र
ते आहे एक अतुट नातं
तुझं न् माझं ” मैत्र “