नीजली रात्र, नीजला चंद्र
नीजली रात्र नीजला चंद्र नीजले अथांग आकाश नीजला वृक्ष नीजले पाखरू नीजला शीतल प्रकाश नीजली सर्व सृष्टी काळोखात हरवले क्षितीज मिटून पापणी नीजेसोबत हळुवार तुही नीज
शब्दांचा निरंतर प्रवास
शब्दांचा निरंतर प्रवास
नीजली रात्र नीजला चंद्र नीजले अथांग आकाश नीजला वृक्ष नीजले पाखरू नीजला शीतल प्रकाश नीजली सर्व सृष्टी काळोखात हरवले क्षितीज मिटून पापणी नीजेसोबत हळुवार तुही नीज
पावसाच्या पाण्यात मन माझे चिंब भिजावे माझ्या आठवणीचे अंकुर तुझ्याही मनात रुजावे आठवणीत माझ्या तुझेही मन धुंद व्हावे आपल्या ह्रदयांस जोडणारे ऋणानुबंध आणखी रुंद व्हावे
चारचौघात स्वतःला हरवून मनोमन हसताना एखाद्या सायंकाळी उंबरठ्यावर गप्पा मारत बसताना एखाद्या शांत रात्री आकाशाकडे बघत असताना सगळ्यांच्या नजरा चोरुन हळुच डोळ्यातलं पाणी पुसताना जिवलगांची सोबत असूनही तुला समजून घेणारं कोणीच नसताना कधीतरी मला आठवशील ना? माझी एखादी तरी आठवण…
मावळता सुर्य क्षितिजा पलीकडे जाताना काळाकुट्ट अंधार सोडून जातो क्षणार्धात त्याच क्षितिजाआडून एक चंद्र मंद निर्मळ प्रकाश घेऊन येतो आपल्या मैत्रीचा बंधही असाच नकळत तुटणार तेव्हा डोळ्यात पाणी नाही हं आणायचं! कारण मला खात्री आहे त्यानंतर तुला माझ्याहूनही चांगला मित्र…
माहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं माझ्या मनातलं सगळं काही तुला आपोआपच ओळखता येतं कदाचित यालाच मैत्री म्हणतात जी राहते निरंतर आणि कायमची राहील ना?
पावसाच्या सरी चिरत धावणाऱ्या सैरवैर वाऱ्यामुळे एखादा वृक्ष खदखदून हसतो बेभान वाहणारा हा वाराही तिच्या स्पर्शाप्रमानेच भासतो मग अलगद आकाशात सप्तरंगी इंद्रधनु उमटते त्यातही मला तिचाच चेहरा दिसतो अन् विसरुन सारे देहभान मी तो चेहराच न्याहाळत बसतो