मराठी कविता

Nishabd chya hya vibhaga antargat tumhala mazya marathi kavita vachayala miltil. Kavitecha aashay tumhala samjel ashi asha ahe.

boltana-jya-shabdani

बोलतांना ज्या शब्दांनी

बोलतांना ज्या शब्दांनी करायचीस तु माझ्या हृदयावर प्रेमाचे घाव तो प्रत्येक शब्द माझ्या मनाच्या भिंतीवर कोरलाय मी ऐकून ज्या हृदयाचे शब्द खेलायचीस तु माझ्या मनाशी प्रेमाचा लपंडाव त्या हृदयाचा एक तुकडा तुझ्या नकळत चोरलाय मी

rahunach-gel

राहूनच गेलं

खूप बोलायचो आम्ही, गप्पाही खूप रंगायच्या पण तिला बोलताना पहायचं राहूनच गेलं खूप करायचो मस्करी, हसणंही खूप व्हायचं पण तिला हसताना पहायचं राहूनच गेलं कधी कधी गालातली गालात लाजायचोही पण तिला लाजताना पहायचं राहूनच गेलं असायचो जवळ एकमेकांच्या, तिची सोबतही…

ek-nat-shabdat-gurfatlel

एक नातं शब्दांत गुरफटलेलं

एक नातं शब्दांत गुरफटलेलं शब्दांतच ओळख, शब्दांतच मैत्री शब्दांतच विश्वास, शब्दांतच खात्री शब्दांतच सोबत, शब्दांतच सहवास शब्दांतच आनंद, शब्दांतच त्रास शब्दांतच रडणं, शब्दांतच हसणं शब्दांतच रागावणं, शब्दांतच रूसनं शब्दांतच जवळीक, शब्दांतच अंतर शब्दांतच मर्यादित, शब्दांतच निरंतर एक नातं शब्दांत गुरफटलेलं…

konich-nasave-aapale

कोणीच नसावे आपले स्वतःचे

कोणीच नसावे आपले स्वतःचे आपलेपणाचा भासच नको कोणतीच नाती नसावी खरी खोटा तो विश्वासच नको कोणतीच नसावी वाट सुखाची आशेवरचा प्रवासच नको कोणतेच नसावे कारण जगण्याला निरंतर चालणारे ते श्वास च नको

shabd-purese-nasale-tari

शब्द पुरेसे नसले तरी

शब्द पुरेसे नसले तरी प्रेम अबोल राहत नाही ते व्यक्त होतं कधी कोणाच्या विचारांतून तर कधी कोणाच्या वागण्यातून कधी कोणाच्या हसण्यातून तर कधी कोणाच्या रडण्यातून कधी कोणाच्या नजरेतून तर कधी कोणाच्या स्पर्शातून कधी कोणाच्या काळजीतून तर कधी कोणाच्या रागातून प्रेम…