मराठी कविता

Nishabd chya hya vibhaga antargat tumhala mazya marathi kavita vachayala miltil. Kavitecha aashay tumhala samjel ashi asha ahe.

ozaratya-najarene

ओझरत्या नजरेने

ओझरत्या नजरेने शेवटचे तुला पाहीन मी तुझ्या सांगण्यावरून तुझ्यापासून दूर जाईन मी तुझे हृदय देशील ही तु दुसऱ्या व्यक्तीला पण तुझ्या हृदयात अविस्मरणीय आठवण बनून राहीन मी

komal-hatani-japlelya

कोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या

कोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या विखुरलेल्या पाकळ्या झाल्या प्रेमाने घट्ट बांधल्या गेलेल्या गाठी अलगद मोकळ्या झाल्या रेशमापेक्षा नाजुक ऋणानुबंधांच्या छिन्न विछिन्न साखळ्या झाल्या

rangahin-vate-chitra-sare

रंगहिन वाटे चित्र सारे

रंगहिन वाटे चित्र सारे हरवल्यात सगळ्या रंगछटा धुसर दिसती सर्व दिशा काळोखात निजल्या सगळ्या वाटा मी आता केवळ एका निश्चल सागरा सारखा शमल्या आहेत सगळ्या लाटा

vadhale-ahe-don-hrudayatil-antar

वाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर

वाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर तिच्या वेड्या मनाला हे कळेना कासावीस होऊन जाते माझे मन तिच्या डोळ्यातून एक अश्रुही गळेना माझीया प्रियाला प्रित कळेना माझीया प्रियाला प्रित कळेना

ghalat-baste-ti-shabdanchi-sangad

घालत बसते ती शब्दांची सांगड

घालत बसते ती शब्दांची सांगड प्रेमाचा अर्थ काही तिला कळेना प्रश्नही माझे अनुत्तरीतच राहतात काही केल्या त्यांना उत्तर मिळेना माझीया प्रियाला प्रित कळेना माझीया प्रियाला प्रित कळेना

ekmekanchya-jivat-jiv-guntalela

एकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला

एकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला बाकी कशातच मन रूळेना तरीही दुर जाताना मात्र तिचं पाऊल काही मागे वळेना माझीया प्रियाला प्रित कळेना माझीया प्रियाला प्रित कळेना