मराठी कविता

Nishabd chya hya vibhaga antargat tumhala mazya marathi kavita vachayala miltil. Kavitecha aashay tumhala samjel ashi asha ahe.

visarav-kadhitari-vastav

विसरावं कधीतरी वास्तव

विसरावं कधीतरी वास्तव थोडसं स्वप्नातही जगावं पापण्यांना वर सरसावून क्षितिजापलिकडे बघावं एका ओझरत्या नजरेनं सारं चांदनं स्वतःमध्ये सामावून घ्यावं स्वतःच पाउस होउन त्यांच्या आठवणीत मनसोक्त बरसून जावं

kalatach-nahi-mala

कळतच नाही मला, असं का होतं..

सगळीकडे सैरवैर धावणारं मन नकळत आठवणीँच्या कुशीत जातं कळतच नाही मला, असं का होतं अनंत सुंदर स्वप्नांपैकी फक्त तुटणारं स्वप्नच वास्तवाचं रूप घेतं कळतच नाही मला, असं का होतं सुख-दु:खाने भरलेल्या ओंजळीतलं सुख चटकन सरून जातं कळतच नाही मला, असं…