सगळीकडे सैरवैर धावणारं मन नकळत आठवणीँच्या कुशीत जातं
कळतच नाही मला, असं का होतं
अनंत सुंदर स्वप्नांपैकी फक्त तुटणारं स्वप्नच वास्तवाचं रूप घेतं
कळतच नाही मला, असं का होतं
सुख-दु:खाने भरलेल्या ओंजळीतलं सुख चटकन सरून जातं
कळतच नाही मला, असं का होतं
हवा असतो ज्या व्यक्तीँचा सहवास त्यांनाच नशीब आयुष्यापासुन दुर नेतं
कळतच नाही मला, असं का होतं
बोलून व्यक्त करायच्या नसतात काही भावना पण त्यांनाच शब्दांचं स्वरूप येतं
कळतच नाही मला, असं का होतं