स्वप्न म्हणजे दृश्य, मनाला सुखावणारं
स्वप्न म्हणजे आकृती, दडलेल्या भावनांची
स्वप्न म्हणजे प्रतिबिंब, इच्छा आणि अपेक्षांचं
स्वप्न म्हणजे सावली, मनातल्या आकांक्षांची
स्वप्न म्हणजे कल्पना, वास्तवापेक्षा सुंदर
स्वप्न म्हणजे भ्रांती, हरवल्या जीवाची
स्वप्न म्हणजे आठवण, पाणावल्या डोळ्यांची
स्वप्न म्हणजे वेदना, तुटलेल्या हृदयाची
स्वप्न म्हणजे आस, वेडावल्या मनाची
स्वप्न म्हणजे ओढ, पलीकडल्या जगाची
स्वप्न म्हणजे ध्येय, झोप उडवणारं
स्वप्न म्हणजे लक्ष्य, बंद डोळ्यांनी दिसणारं
स्वप्न म्हणजे भविष्य, आयुष्य घडवणारं
स्वप्न म्हणजे सत्य, उद्याचा वर्तमान