मी माझी पहिली कविता आजपासून सुमारे तीन वर्षांपूर्वी लिहिली होती. त्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या आहेत आणि त्यापैकी बऱ्याचश्या येथे प्रकाशित करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला मी माझ्या मातृभाषेत (मराठी) भाषेत कविता लिहिल्या होत्या. त्यानंतर शब्दांशी मैत्री झाली आणि मी राष्ट्रीय (हिंदी) आणि आंतरराष्ट्रीय (इंग्लिश)भाषेत देखील कविता लिहू लागलो.
लिखाणाची आणि वाचनाची फारशी आवड नसल्याने माझ्या लिखाण क्षमतेकडे मी सुरुवातीला दुर्लक्ष केले होते. आपण लिहिलेल्या कविता व्यवस्थित एका ठिकाणी संग्रहित करून ठेवाव्या असा विचारही कधी मनात आला नव्हता. साधारणतः मी एखादी कविता सुचली तर ती माझ्या फोन मध्ये संग्रहित करून ठेवायचो. त्यावेळी मी माझ्या कविता माझ्या मित्रांनाच वाचायला देत असे. त्यांना कविता आवडली तर मला कौतुकाचे दोन शब्दही ऐकायला मिळायचे. त्यानंतर मी माझ्या कविता बहिणींना वाचायला दिल्या. काळांतराने मी कविता लिहितो हे माझ्या घरच्यांनाही कळले. त्यानंतर जेव्हा जेव्हा माझ्या कविता लिखाणाबद्दल कोणाला कळले त्यांनी एकच गोष्ट सांगितली. मी माझ्या सगळ्या कविता संग्रहित करून ठेवाव्या असे त्यांना वाटायचे. कदाचित माझा लिखाणाबद्दलचा निष्काळजीपणा त्याला कारणीभूत असावा.
त्यांच्यासाठी माझे कविता करणे एखाद्या कलेपेक्षा कमी नव्हते. माझ्यासाठी मात्र कविता हे फक्त शब्दांच्या मदतीने माझ्या मनातील भावना प्रकट करण्याचे एक माध्यम होते. पण मला अजूनही तो दिवस चांगला आठवतो जेव्हा माझ्या एका मित्राने कविता संग्रहित करून ठेवण्याचे महत्व मला पटवून दिले होते. त्याचे म्हणणे ऐकून मी भलताच प्रेरित झालो होतो. फार तर फार एक वर्ष झाले असावे , मी २ दिवस माझ्या जुन्या कविता शोधण्यात घालवले होते. त्यासाठी मी फोन मधले सगळे संदेश वाचून काढले होते. तेव्हापासून मी माझ्या सगळ्या कविता एका ठिकाणी संग्रहित करून ठेवल्या आहेत. मी पुढेही हे करत राहणार आहे.
मागच्या वर्षाच्या सुरुवातीला एक कल्पना मनात आली. वाटले माझे लिखाण सर्वांसाठी वाचायला उपलब्ध करून द्यावे. त्यानंतर मी त्याच कामात स्वतःला व्यस्थ करून घेतले. त्या कामाचे फळ म्हणजे हे संकेतस्थळ – निःशब्द. हे काम करत असताना मी बरेच काही शिकलो. तुमचा ह्या संकेतस्थळावरचा अनुभव अजून चांगला करण्यासाठी मी असेच काम करत राहणार आहे.
माझ्या शब्दांचा हा प्रवास अपूर्ण आहे आणि तो असाच चालू राहील, निरंतर.
I had written my first poem almost three years ago. After that I have written a lot of poems and most of them have been published here. Initially, I wrote poems in my mother tongue (Marathi). Then came the friendship with words and I started writing poems in national language (Hindi) and international (English).
Since I did not like writing and reading much, I initially ignored my writing capacity. There was no thought that we should keep the poems written properly in one place.
Since I did not like writing and reading much, I initially ignored my writing capacity. There was no thought that we should keep the poems written properly in one place. Normally, if I wrote a poem I would have stored it in my phone. At that time I was giving my poems to my friends to read. If they liked the poem, I would also hear two words of admiration. Then I gave my poems to my sisters to read. My family members also know that I am writing poems. Then whenever anyone knew about my poem writing, they told the same thing. They thought that I should store all my poems. It may be possible that the negligence of my writing have caused them to think like that. My poems were not less than an art for them. For me, poetry was just a medium to express my feelings with the help of words. But I still remember that day when one of my friends had told me about the importance of keeping poetry stored. I was inspired after listening to him. It would have been hardly one year ago, I had spent 2 days searching my old poems. I had read all the messages from the phone. Since then, I have kept all my poems in one place. I am going to continue doing this too.
There was an idea in the beginning of the last year(2012). I thought my writing should be made available for reading to all. Then I got myself involved in the same work. The result of that work is the website – Nishabd. I learned a lot while doing this work. I’m going to do the same thing to make your experience better on this website.
This journey of my words is incomplete and it will continue to be that, continuously.