प्रीत जुळता जुळता
जुळावी प्रेमाची नाती
स्नेहाच्या सौम्य सरींनी
भिजावी मनाची माती
भावनांची उमलावी कळी
दरवळावा ओढीचा सुगंध
गोड क्षणांच्या आठवणीने
चेहऱ्यावर फुलावा आनंद
सरावे शंकांचे मेघ
आशेचा इंद्रधनु उमटावा
शमावे भीतीचे वादळ
प्रेमाचा विजय व्हावा