हटता रात्रीचे पांघरून
जागा झाला नारायण
लाल केशरी रंगांनी
त्यानं सजवलं जग
पक्ष्यांनाही जाग आली
गाईने हंबरडा फोडला
कोकिळेने ताण दिली
चिमण्यांनी सुर धरला
झाडांना पालवी फुटली
कळ्यांची फुले झाली
नव्या दिवसाची सुरुवात
रम्य पहाटेने केली
अंगणात सडा पडला
माती सुगंधित झाली
भल्या पहाटे पहाटे
सृष्टीला जाग आली
रस्त्यांनीही हळू हळू
जीवांची गर्दी हेरली
बाळ लेकरांना गोंजारत
रम्य पहाट सरली