उमगले ना कधी
गुढ तुझ्या मनाचे
नेहमीच पाहिले मी
गुपीत तुझ्या ओठांवर
डोळ्यांत प्रीतीची रेघ
शब्दांत ना पुरावा
नेहमीच पाहिले मी
अश्रु तुझ्या पापणीवर
ओढ वेड्या मनाला
भावनां घातलें कुंपण
नेहमीच पाहिले मी
थरकाप तुझ्या श्वासांवर
प्रेम उत्स्फुर्त अतुट
मौनास हारला शेवट
नेहमीच पाहिले मी
घाव तुझ्या ह्रदयावर