काय असते मैत्री ?
गर्दीत असताना
मित्राने मारलेली हाक म्हणजे मैत्री
अडचणीत असताना
मित्राने हातात दिलेला हात म्हणजे मैत्री
एकटेपणा असताना
मित्राने दिलेली साथ म्हणजे मैत्री
चुकणारे पाऊल पाहून
मित्राने मारलेली चपराक म्हणजे मैत्री
डोळ्यातले पाणी सावरण्यासाठी
मित्राने दिलेला आधार म्हणजे मैत्री
सगळे अशक्य असताना
मित्राने दिलेला खोटा विश्वास म्हणजे मैत्री