charchaughat-swatala-haravun

चारचौघात स्वतःला हरवून

चारचौघात स्वतःला हरवून
मनोमन हसताना

एखाद्या सायंकाळी उंबरठ्यावर
गप्पा मारत बसताना

एखाद्या शांत रात्री
आकाशाकडे बघत असताना

सगळ्यांच्या नजरा चोरुन
हळुच डोळ्यातलं पाणी पुसताना

जिवलगांची सोबत असूनही
तुला समजून घेणारं कोणीच नसताना

कधीतरी मला आठवशील ना?

माझी एखादी तरी आठवण तुझ्या मनात साठवशील ना?

Nishabd-Logo
प्रतिक अक्कावार

शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *