तुझं लपून उगाचच हसणं
तुझं शुल्लक गोष्टीवरून रुसणं
तुझं दिवसरात्र काळजी करत बसणं
आवडतं मला

तुझं नजरेतच सुंदर लाजणं
तुझं चांदण्या बघत निजणं
तुझं प्रीतीच्या पावसात चिंब भिजणं
आवडतं मला

तुझं बोलता बोलता बावरणं
तुझं मनातल्या भावनांना सावरणं
तुझं प्रेमात पडूनही स्वतःला आवरणं
आवडतं मला

Default image
प्रतिक अक्कावार

शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक.

Leave a Reply

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.