ajun-hi-aathavat-mala

अजून ही आठवतं मला

अजून ही आठवतं मला
आपल्या आठवणींतल स्वप्नांचं घर

जिथे फक्त आपण दोघेच राहायचो
अन् सोबतीला आपले श्वास निरंतर

जिथे वाहायची काळजीची नदी
अन् सजायचा आपलेपणाचा डोंगर

जिथे फुलायचे मैत्रीचे फुल
अन् प्रेमाला यायचा बहर

जिथे आपल्या सोबतीला असायचा सैरवैर वारा
अन् पावसाची चिंबओली सर

जिथे खूप रंगायच्या आपल्या गप्पा
अन् जुळायचे मनांतील प्रीतीचे स्वर

जिथे हसण्याला निमित्त नसायचे
अन् साचायचे आनंदाचे थरावर थर

जिथे पुसायचो आपण एकमेकांच्या डोळ्यांतील
अश्रू अन् पडायचा दुःखाचा विसर

जिथे तासंतास रमायचो आपण
अन् वाटायचे थांबावे अजून क्षणभर

जिथे अजूनही जावेसे वाटते
अन् परतावे ना लवकर

अजून ही आठवतं मला
आपल्या आठवणींतल स्वप्नांचं घर

Nishabd-Logo
प्रतिक अक्कावार

शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *