happiness

awadat-mala

आवडतं मला

तुझं लपून उगाचच हसणं तुझं शुल्लक गोष्टीवरून रुसणं तुझं दिवसरात्र काळजी करत बसणं आवडतं मला तुझं नजरेतच सुंदर लाजणं तुझं चांदण्या बघत निजणं तुझं प्रीतीच्या पावसात चिंब भिजणं आवडतं मला तुझं बोलता बोलता बावरणं...

ajun-hi-aathavat-mala

अजून ही आठवतं मला

अजून ही आठवतं मला आपल्या आठवणींतल स्वप्नांचं घर जिथे फक्त आपण दोघेच राहायचो अन् सोबतीला आपले श्वास निरंतर जिथे वाहायची काळजीची नदी अन् सजायचा आपलेपणाचा डोंगर जिथे फुलायचे मैत्रीचे फुल अन् प्रेमाला यायचा बहर...

ek-nat-shabdat-gurfatlel

एक नातं शब्दांत गुरफटलेलं

एक नातं शब्दांत गुरफटलेलं शब्दांतच ओळख, शब्दांतच मैत्री शब्दांतच विश्वास, शब्दांतच खात्री शब्दांतच सोबत, शब्दांतच सहवास शब्दांतच आनंद, शब्दांतच त्रास शब्दांतच रडणं, शब्दांतच हसणं शब्दांतच रागावणं, शब्दांतच रूसनं शब्दांतच जवळीक, शब्दांतच अंतर शब्दांतच मर्यादित,...

nijali-ratra

नीजली रात्र, नीजला चंद्र

नीजली रात्र नीजला चंद्र नीजले अथांग आकाश नीजला वृक्ष नीजले पाखरू नीजला शीतल प्रकाश नीजली सर्व सृष्टी काळोखात हरवले क्षितीज मिटून पापणी नीजेसोबत हळुवार तुही नीज

pavsachya-panyat

पावसाच्या पाण्यात

पावसाच्या पाण्यात मन माझे चिंब भिजावे माझ्या आठवणीचे अंकुर तुझ्याही मनात रुजावे आठवणीत माझ्या तुझेही मन धुंद व्हावे आपल्या ह्रदयांस जोडणारे ऋणानुबंध आणखी रुंद व्हावे

ek-bhet

एक भेट

कधी कधी अनोळखी नजरही ओळख देऊन जाते कुणाची रंगहीन सावलीही जीवनात रंग भरून जाते नातं जुळायला सहवासाची गरज नसते कधी कधी एक भेटही आयुष्यभराचा सहवास देऊन जाते