प्रेम म्हणून तुझ्यात मी पूर्णतः हरवलो
तुला मी मात्र कधी सापडलोच नाही
हे प्रेम कसं?
तुझ्या विचारात बुडून मी रात्रभर जागलो
तुझ्या मनात मात्र माझा विचारच नाही
हे प्रेम कसं?
तुझ्या आठवणीत मी तासं न् तास रमलो
माझ्या आठवणी मात्र तुझ्या लक्षातच नाही
हे प्रेम कसं?
तुझ्या विरहात मी कित्येक दिवस झुरत बसलो
तुझ्या मनात मात्र माझं अस्तित्वच नाही
हे प्रेम कसं?