अजून ही आठवतं मला

ajun-hi-aathavat-mala

अजून ही आठवतं मला
आपल्या आठवणींतल स्वप्नांचं घर

जिथे फक्त आपण दोघेच राहायचो
अन् सोबतीला आपले श्वास निरंतर

जिथे वाहायची काळजीची नदी
अन् सजायचा आपलेपणाचा डोंगर

जिथे फुलायचे मैत्रीचे फुल
अन् प्रेमाला यायचा बहर

जिथे आपल्या सोबतीला असायचा सैरवैर वारा
अन् पावसाची चिंबओली सर

जिथे खूप रंगायच्या आपल्या गप्पा
अन् जुळायचे मनांतील प्रीतीचे स्वर

जिथे हसण्याला निमित्त नसायचे
अन् साचायचे आनंदाचे थरावर थर

जिथे पुसायचो आपण एकमेकांच्या डोळ्यांतील
अश्रू अन् पडायचा दुःखाचा विसर

जिथे तासंतास रमायचो आपण
अन् वाटायचे थांबावे अजून क्षणभर

जिथे अजूनही जावेसे वाटते
अन् परतावे ना लवकर

अजून ही आठवतं मला
आपल्या आठवणींतल स्वप्नांचं घर

प्रतिक अक्कावार

प्रतिक अक्कावार

नमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

You may also like...

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: